Jalna Police Patil Bharti 2025 : महाराष्ट्रात पोलीस पाटील पदाला गावपातळीवरील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. पोलीस विभागाला गावातील घडामोडींची माहिती देणे, गुन्हेगारी नियंत्रणासाठी मदत करणे आणि ग्रामस्थांमध्ये शिस्त टिकवणे ही जबाबदारी या पदावर असते.
जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 अंतर्गत यंदा मोठ्या प्रमाणात पदांची घोषणा झाली आहे. एकूण 722 पदांसाठी ही भरती होत असून जालना, भोकरदन , अंबड आणि परतूर या चार उपविभागांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
येथे आपण या भरतीसंबंधी सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यात पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड पद्धत, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत जाहिरात डाउनलोड लिंक यांचा समावेश आहे. जर तुम्ही पोलीस पाटील पदासाठी इच्छुक असाल, तर ही माहिती काळजीपूर्वक वाचून योग्य तयारीसह अर्ज करणे आवश्यक आहे.
भरतीचा आढावा (Jalna Police Patil Bharti 2025)
तपशील | माहिती |
---|---|
भरतीचे नाव | पोलीस पाटील भरती 2025 |
जिल्हा | जालना |
एकूण पदसंख्या | 722 |
उपविभाग | जालना, भोकरदन , अंबड , परतूर |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2025 |
लेखी परीक्षेची तारीख | 12 ऑक्टोबर 2025 |
अधिकृत संकेतस्थळ | jalnapp.recruitonline.in |
उपविभागनिहाय पदांची संख्या (Jalna Police Patil Bharti 2025)
उपविभाग | पदसंख्या |
---|---|
जालना | 185 |
भोकरदन | 201 |
अंबड | 183 |
परतूर | 153 |
एकूण | 722 |
शैक्षणिक पात्रता (Eligibility)
- उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण (SSC Pass) असावा.
- उमेदवार संबंधित गावाचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक.
- मराठी वाचन, लेखन व संवाद कौशल्य असणे आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय: 25 वर्षे
- कमाल वय: 45 वर्षे
- वयोमर्यादेत कोणतीही सवलत लागू नाही.
वेतन (Pay Scale)
- पोलीस पाटील पद हे मानधनाधारित पद आहे.
- शासनाच्या नियमानुसार मानधन व भत्ते दिले जातील.
- हे पद सामाजिक प्रतिष्ठेचे असून गावातील नेतृत्व व जबाबदारी यामध्ये समाविष्ट आहे.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
- उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा.
- अधिकृत संकेतस्थळ: https://jalnapp.recruitonline.in
- नोंदणी करून अर्ज फॉर्म भरावा.
- शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, रहिवासी दाखला स्कॅन करून अपलोड करावा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी.
अर्ज शुल्क (Application Fee)
- सर्वसाधारण प्रवर्ग (Open Category): ₹800/-
- राखीव प्रवर्ग (SC/ST/OBC/EWS): ₹600/-
- शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाईल.
- लेखी परीक्षा: 80 गुण
- मुलाखत: 20 गुण
- एकूण: 100 गुण
- लेखी परीक्षेत किमान 36 गुण (45%) मिळणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
- लेखी परीक्षा: 12 ऑक्टोबर 2025
अधिकृत जाहिरात डाउनलोड (Official Advertisement Download)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित उपविभागाची अधिकृत जाहिरात PDF नीट वाचणे आवश्यक आहे. यात गावनिहाय पदसंख्या, अर्ज प्रक्रिया, परीक्षा नियम आणि आवश्यक कागदपत्रे यांची सविस्तर माहिती दिली आहे.
📄 अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे भेट द्या:
👉 jalnapp.recruitonline.in/Advertise.asp
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1) जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 मध्ये किती पदांसाठी भरती आहे?
➡ एकूण 510 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
2) ही पदे कोणत्या उपविभागांमध्ये आहेत?
➡ जालना (185),भोकरदन , (201), अंबड (183) परतूर (153).
3) शैक्षणिक पात्रता काय आहे?
➡ किमान 10वी उत्तीर्ण (SSC Pass) आणि संबंधित गावाचा रहिवासी असणे आवश्यक.
4) अर्ज कसा करावा?
➡ अर्ज फक्त ऑनलाईन jalnapp.recruitonline.in या संकेतस्थळावर करता येईल.
5) अर्ज शुल्क किती आहे?
➡ Open Category साठी ₹800/- व राखीव प्रवर्गासाठी ₹600/- आहे.
6) निवड प्रक्रिया कशी होईल?
➡ लेखी परीक्षा (80 गुण) व मुलाखत (20 गुण) अशा दोन टप्प्यांत निवड केली जाईल.
जालना जिल्हा पोलीस पाटील भरती 2025 ही एकूण 722 पदांसाठीची मोठी भरती आहे. ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांसाठी ही प्रतिष्ठेची व जबाबदारीची संधी आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून दिलेल्या तारखेत अर्ज करणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षा व मुलाखत यासाठी योग्य तयारी करून उमेदवारांनी ही संधी साधावी.
👉 पोलीस पाटील पद हे केवळ रोजगाराचे साधन नसून गावातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी असलेले एक सन्माननीय पद आहे. त्यामुळे योग्य पात्र उमेदवारांनी अर्ज करून आपल्या गावासाठी व समाजासाठी ही जबाबदारी स्वीकारावी.
📲 सोशल मीडिया अपडेटसाठी आमच्यासोबत रहा:
- WhatsApp गट: सामील व्हा
- Telegram चॅनेल: Join Now
- WEBSITE : bhartiguide.com
- Instagram : Bharti Guide